महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी मृत घोषित केलेला संभाव्य रुग्ण जिवंत?

उस्मानाबादमधील 7 संभाव्य रुग्णांपैकी सातही व्यक्ती जिवंत असून या सर्वांनाच होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

By

Published : Apr 4, 2020, 10:51 AM IST

उस्मानाबाद-कोरोना व्हायरस बाबतीत जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचे समोर येते आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या कर्यक्षेमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. दिल्ली येथील हजरत निजामुद्दीनचे कनेक्शन असलेल्या 7 संभाव्य रुग्णांची यादी जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. यासंदर्भात प्रशासनाने शोध घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी माध्यमांना माहिती दिली की, यातील चार संभाव्य रुग्ण दिल्ली येथे आहेत. तर उरलेल्या तीन संभाव्य रुग्णांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर दोघांची तपासणी करण्यात आली आहे. या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असे सांगितले.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

त्यामुळे या मृत व्यक्ती प्रकरणी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. हा मृत व्यक्ती कुठला आहे, हा रुग्ण कोरोना व्हायरसमुळे मृत झाला की आणखी काही, असे विविध प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत होते. याप्रकरणी ईटीव्ही भारतने माहिती घेतल्यानंतर या 7 संभाव्य रुग्णांपैकी सातही व्यक्ती जिवंत असून या सर्वांनाच होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याचबरोबर तो व्यक्ती तेरचा आहे. त्याच्या आईच्या नावावर सिम कार्ड होते व या व्यक्तीची आई मृत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती न घेताच 7 पैकी एक संभाव्य रुग्ण मृत असल्याचे जाहीर केले. यासंर्भात ईटीव्ही भारतने जिल्हाधिकाऱ्यांना 2 आणि 3 एप्रिलला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. जिल्हाधिकारी या जिल्हाप्रमुख असून त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे सामान्य लोक गांभीर्यपूर्वक लक्ष देतात. मात्र, कोरोनाव्हायरस संदर्भात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे गंभीर नसल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details