उस्मानाबाद- जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा वेळी कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच कोविड केअर सेंटरला तीन रुग्णवाहिका दिल्या आहेत. या रुग्णवाहिका जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
उस्मानाबाद: आमदार तानाजी सावंत यांची कोविड सेंटरला मदत, दिल्या 3 रुग्णवाहिका - mla tanaji sawant osmanabad
रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच कोविड केअर सेंटरला तीन रुग्णवाहिका दिल्या आहेत. या रुग्णवाहिका जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
रुग्णवाहिका
रुग्णवाहिका वितरणावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, आमदार कैलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांची उपस्थित होती.