महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का मंदी..?

नाईट लाईफमुळे रोजगार निर्मिती होईल पण, राज्यातील आया-बहिणी सुरक्षीत आहेत का, असा सवाल कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

आमदार चंद्रकांत पाटील
आमदार चंद्रकांत पाटील

By

Published : Feb 12, 2020, 7:49 PM IST

Updated : Feb 12, 2020, 11:58 PM IST

उस्मानाबाद- बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का? मंदी, असे म्हणत मंदी ही कुठल्या देशातून येत नाही तर मंदी ही जगभर असते. थोरातांनी मंदी समजून घ्यायला हवी, असे म्हणत थोरातांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बोलताना आमदार चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील बुधवारी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे आमदार पाटील म्हणाले, नाईट लाईफमुळे रोजगार जरी मिळत आहे, असे वाटत असेल तरी महाराष्ट्रात आया-बहिणी सुरक्षित नाहीत. नवरात्रीला एक-दोन दिवस रात्रीच्या कार्यक्रमाला परवानगी असते. पण, त्या रात्रीही किती गैर प्रकार होतात. त्यामुळे या नाईट लाईफची काही आवश्यकता नव्हती. 'एका कुटुंबाला वाटतं म्हणून, नाईट लाईफ..!' असे म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

पुढे सरकारवर निशाणा साधत चंद्रकांत पाटील म्हणाले, तीन पक्षाचे सरकार असल्याने एखाद्याला एखादा निर्णय घ्यायचा म्हणलं की, दुसऱ्याला ते पटत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल त्यांच्यात काहीच समन्वय नाही. त्यांनी समन्वय ठेवत लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावे.

हेही वाचा -सोलापूर-तुळजापूर महामार्गावर गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग; आगीत सिलेंडरचे स्फोट

Last Updated : Feb 12, 2020, 11:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details