प्रतिक्रिया देताना महादेव जानकर धाराशिव : Mahadev Jankar :कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात (Tulja Bhavani) व्हीआयपी नेत्यांना अनेकदा थेट दर्शन दिलं जातं, त्यामुळं भाविकांना ताटकळत उभं राहावं लागतं. तर काही मंदिरांमध्ये त्याबाबतीतही भेदभाव केला जातो. तर तुळजाभवानी मंदिरात नेतेमंडळी आली तर त्यांना गाभाऱ्यात प्रवेश मिळतो, असा आरोप होत असतानाच आज महादेव जानकर यांच्याबाबतीत असंच घडलं आहे.
गाभाऱ्यात जाण्यापासून सुरक्षारक्षकानी रोखलं : बुधवारी महादेव जानकर तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. महादेव जानकर यांना तुळजाभवानी देवीच्या (Tuljabhavani Temple) गाभाऱ्यात जाण्यापासून सुरक्षारक्षकांनी रोखलं. त्यामुळं जानकर यांनी संताप व्यक्त केलाय. यापूर्वी संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनाही गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं होतं.
जलस्वराज्य यात्रेची सुरुवात : बुधवारपासून महादेव जानकर यांची जनस्वराज्य यात्रेची सुरुवात श्री तुळजाभवानीच्या आरतीनं होणार होती. परंतु, असा प्रकार घडल्यामुळं जानकर यांना बाहेरूनच आरती करून आपल्या या जनस्वराज्य यात्रेला (Jan Swarajya Yatra) सुरुवात करावी लागली.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त : मंदिरातील सुरक्षारक्षकांनी जानकरांना अडवल्याने त्यांनी संताप व्यक्त केलाय. माजी मंत्री असूनही मला अडवण्यात आलं. या कर्मचाऱ्यांना प्रोटोकॉल माहीत नाही वाटतंय, असं जानकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला सुनावलं. त्यामुळं जानकर यांना गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेवून परत बाहेर फिरावं लागलं. मंदिर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत जानकरांनी संताप व्यक्त करत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार असल्याचे म्हटले आहे.
आम्ही जनतेचे सेवक आहोत. मंदिर प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल पाहून त्यांना थांबवलं पाहिजे. याचा विचार प्रशासनाने करायला पाहिजे. याबाबत मी जिल्हाधिकारी यांना बोलणार आहे - महादेव जानकर, माजी मंत्री
गाभाऱ्यात प्रवेश नाही : महादेव जानकर आले तेंव्हा अभिषेक पूजा संपलेली होती. तसेच आरतीही सुरू होती. आरती सुरू असताना पुजाऱ्याशिवाय कोणालाच गाभाऱ्यात सोडलं जात नाही. त्यामुळे जानकर यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला नाही, असे तुळजभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांनी भ्रमणध्वनीद्वारे सांगितलं.
हेही वाचा -
- तुळजाभवानी देवीच्या २४ पुजाऱ्यावर कारवाई, ८ पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदी
- Tuljabhavani Gold Silver: तुळजापूर मंदिरात दान केलेले सोने-चांदी वितळविण्यास माजी पुजाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांना विरोध, जाणून घ्या कारण
- Tulja Bhavani Temple : अंगावर तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजापूर मंदिरात दर्शनास मनाई; ड्रेस कोड लागू