महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सामोपचाराने अन् राजकारण विरहित संमेलने पार पडावीत'

गोरोबाकाकांच्या नगरीत साहित्य संमेलन होत आहे. ही अभिमानाची बाब आहे. मात्र, अशा सांस्कृतिक कार्यक्रमात राजकारण होऊ नये, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

amit deshmukh
अमित देशमुख

By

Published : Jan 10, 2020, 10:20 PM IST

उस्मानाबाद -मराठवाड्यात आणि ते ही गोरोबांच्या नगरीत साहित्य संमेलन होत आहे. ही अभिमानाची बाब आहे. मात्र, अशा सांस्कृतिक कार्यक्रमात राजकारण होऊ नये, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे. यामधून संस्कृतीची शिदोरी सर्वांना मिळावी, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली. उस्मानाबाद येथे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. या प्रसंगी अमित देशमुख उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... मराठी साहित्य संमेलन : संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या विरोधात वाटली पत्रके

सध्या साहित्य संमेलनात जो प्रकार होत आहे, तो निषेधार्थ आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची, मराठीची संस्कृती वेगळी आहे, तीचे जतन करून असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणे आवश्यक असल्याचेही मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शीवली होती. यात राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार मधुकर चव्हाण यांचा समावेश होता.

हेही वाचा... बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

ABOUT THE AUTHOR

...view details