महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाऊस आणि कोरोनामुळे टाळले ध्वजारोहण; महाजनकोचा प्रताप

कौडगावमध्ये महाजनको अंतर्गत ५० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे. या कार्यालयात साधारण २० कर्मचारी काम करतात. या ठिकाणी ध्वजवंदन करण्यासाठी ध्वजस्तंभ देखील उभा करण्यात आला आहे. मात्र आज येथे ध्वजारोहण करण्यात आले नाही.

महाजेनको कार्यालय कौडगाव
महाजेनको कार्यालय कौडगाव

By

Published : Aug 15, 2020, 6:06 PM IST

उस्मानाबाद - देशभरात ७४ वा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव एम.आय.डी.सी मध्ये असलेल्या महाजनकोच्या कार्यालयात ध्वजवंदनच करण्यात आले नाही.

कौडगावमध्ये महाजनको अंतर्गत ५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू आहे. या कार्यालयात साधारण २० कर्मचारी काम करतात. या ठिकाणी ध्वजवंदन करण्यासाठी ध्वजस्तंभ देखील उभा करण्यात आला आहे. मात्र आज येथे ध्वजारोहण करण्यात आले नाही. याच ठिकाणी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता. मात्र ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी येथे कोणीही फिरकले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इथल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाचे वावडे आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याबाबत कौडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास नाईकवाडी यांनी विचारपूस केली त्यानंतर यांना सांगितले की, पाऊस आणि कोरोना असल्यामुळे येता आले नाही. त्यामुळे नाईकवाडी यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असून यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details