महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये पहिल्यांदाच बरसला दमदार पाऊस; शेतकऱ्यांमधून समाधान

मागील दोन महिन्यांपासून उस्मानाबादच्या लोकांना असलेली पावसाची प्रतीक्षा आज (रविवार) संपली. शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

उस्मानाबादमध्ये यावर्षीच्या पावसाळ्यातील पहिला जोरदार पाऊस

By

Published : Aug 11, 2019, 7:55 PM IST

उस्मानाबाद - मागील दोन महिन्यांपासून पावसाळा सुरू आहे. राज्यातील विविध भागात कमी-जास्त प्रमाात पाऊस पडला. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. दरम्यान आज (रविवार) शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

उस्मानाबादमध्ये यावर्षीच्या पावसाळ्यातील पहिला जोरदार पाऊस
पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र उस्मानाबादमध्ये पाऊसच नसल्याने कोरडा दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल, असे वारंवार सांगितले जात होते. मात्र, कृत्रिम पावसाचे भिजत घोंगडे तसेच पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक चिंतेत पडले होते. मात्र आज झालेल्या पावसामुळे थोडेसे समाधान भेटले आहे. येणाऱ्या दिवसात तरी चांगला पाऊस यावा, अशी अपेक्षा लोकांमधून व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details