महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुळजाभवानीची महिषासूर मर्दिनी रुपात अलंकार महापूजा - तुळजापूर नवरात्रोत्सव

शारदीय नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या माळेनिमित्त (दुर्गाष्टमी) तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनीरूपात महापूजा मांडण्यात आली. दुर्गा सप्तसतीचा पाठकरुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पूर्णाहूती देण्याची प्रथा तुळजापूर येथे आहे.

महिषासुरमर्दिनी रूपात तुळजाभवानी

By

Published : Oct 6, 2019, 5:57 PM IST

उस्मानाबाद -शारदीय नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या माळेनिमित्त (दुर्गाष्टमी) तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनीरूपात महापूजा मांडण्यात आली. महिषासूरमर्दिनीचे रुप पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली.

तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनीरूपात महापूजा


महिषासुराने देवतांना हाकलून दिल्यानंतर देवी पार्वतीचा अवतार असलेल्या तुळजाभवानी देवीने दैत्यराज महिषासुराचा वध केला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालून महिषासुर मर्दिनी रूपात महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

हेही वाचा - गोंदियात 'या' एकाच ठिकाणी सर्व समाजातील स्त्रियांसाठी आयोजित होतो रास गरबा


तुळजाभवानी मंदिरात वैदिक होमाचा कार्यक्रम झाला. दुर्गा सप्तसतीचा पाठकरुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पूर्णाहूती देण्याची प्रथा आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्यासह पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, तहसीलदार योगिता कोल्हे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details