उस्मानाबाद : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर तामलवाडी या गावाजवळ सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली. या ट्रकमध्ये घरगुती वापराचे सिलेंडर नेण्यात येत होते. यावेळी लागलेल्या आगीमध्ये गाडीतील सिलेंडरचे स्फोट होऊ लागले. अवघ्या काही मिनिटात संपूर्ण गाडीने पेट घेतला होता. यावेळी लागोपाट 15 सिलेंडरचे स्फोट झाले, या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, परिसरातील दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील गावांनाही हे आवाज ऐकू येत होते.
सोलापूर-तुळजापूर महामार्गावर गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग; आगीत सिलेंडरचे स्फोट - truck accident on solapur highway
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर तामलवाडी या गावाजवळ सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागली. या आगीत गाडीतील सिलेंडरचे स्फोट होऊ लागल्याने तामलवाडी ग्रामस्थांना काही काळासाठी स्ठलांतरीत करण्यात आले.
गॅस सिलेंडर ट्रकचा स्फोट; सोलापूर-हैदराबाद महामार्गावर वाहतूक विस्कळीत
संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. ट्रकमधील सिलेंडसचे साखळी स्फोट होत असल्याने आगीची तीव्रता वाढली. अपघात झाल्यानंतर या परिसरातील तामलवाडी हे गाव सावधानतेसाठी रिकामे करण्यात आले. जवळपासच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. तसेच काहीकाळ वाहतूक कोंडी देखील झाली. सध्या ही आग आटोक्यात आली असून सोलापूर येथील अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Last Updated : Feb 12, 2020, 3:10 PM IST