महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कळंबमध्ये पिस्तुल, तलवार, काठ्या घेऊन दोन गटात तुफान राडा; शहरात भीतीचे वातावरण - हाणामारी

कळंब मध्ये रात्रीच्या सुमारास पिस्तुल, तलवार, काठ्यांचा वापर करत दोन गटात झालेल्या हाणामारी झाली. या हाणामारीने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कळंब येथे दोन गटात हाणामारी

By

Published : Jul 7, 2019, 12:27 PM IST

उस्मानाबाद - कळंब शहरात रात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या हाणामारीत पिस्तुल, तलवार, काठ्यांचा वापर करण्यात आला. या हाणामारीने शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

कळंब येथे दोन गटात हाणामारी


कळंब शहरात रात्रीच्या सुमारास पारधी समाजातील दोन गटात तुफान हाणामारी झाली. या वादाचे कारण अद्यापही स्पष्ट नसले तरी किरकोळ कारणावरून या दोन गटात हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. या हाणामारीत गावठी पिस्तुलने गोळीबार करण्यात आला. शिवाय तलवार, काठ्या आणि दगडांचा देखील वापर भांडणात करण्यात आला आहे.


येथे झालेल्या गोळीबारात २ जण गंभीर जखमी झाले असून या दोघाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ ही घटना घडली असून शहरात तणाव पूर्ण शांतता पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details