उस्मानाबाद - बाप्पाच्या आगमनाला जिल्हाभरात खंड पडलेल्या पावसाची तुरळक ठिकाणी सुरुवात झाली. तर, आज गणरायाला निरोप देताना देखील वरुणराजाने हजेरी लावली होती. त्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता.
गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर गणरायाला आज उत्साहात निरोप देण्यात आला. सर्वत्र शांततेत हा उत्साहात पार पडला असून प्रत्येक मंडळासमोर ढोल ताशा लेझीम अशा पथकांनी आपली कला सादर करत बाप्पाची मिरवणूक काढली. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही तयारी करण्यात आली होती. तर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्याचबरोबर २५०० पोलिसांची फौज देखील तैनात करण्यात आली होती.