उस्मानाबाद- शहरात 93 व्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. या साहित्य संमेलनासाठी उस्मानाबादकर सज्ज झाले आहेत. साहित्य संमेलनाच्या प्रचार व जनजागृतीसाठी शुक्रवारी (दि. 3 जाने.) साहित्याची ज्योत निघाली. उमरगा तालुक्यातील अचलबेट येथून ही ज्योत प्रज्वलित करून जनजागृसाठी नेण्यात आली आहे.
अचालबेट येथून निघाली मराठी साहित्याची ज्योत, आज पोहोचणार उस्मानाबादला
उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रचार आणि जनजागृतीसाठी मराठी साहित्याची ज्योत उमरगा तालुक्यातील अचबेट येथून निघाली असून आज (दि. 4 जाने.) उस्मानाबाद येथे पोहोचणार आहे.
ही साहित्य ज्योत तुळजापूर, तेर, येरमाळा व सोनारी या तीर्थ क्षेत्रातून उस्मानाबाद येथे आज (दि. 4 जाने.) रोजी येणार आहे. ज्योत घेऊन गावोगावी जाऊन साहित्य संमेलनाचा जागर करणार आहे. 10 ते 12 जानेवारी दरम्यान होणाऱ्या संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून कवीसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कवी कट्टा, बालकुमार मेळावा, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 3 साहित्यमंच उभारणी सुरू आहे.
हेही वाचा - साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, आज अचलबेटवरून निघणार साहित्याची ज्योत