उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनामुळे दोन बळी गेले आहेत. कोरोनाच्या पहिल्या दोन बळीची नोंद शुक्रवारी रात्री झाली आहे. यातील पहिला रुग्ण हा उस्मानाबाद तालुक्यातील कोड या गावातील आहे तर दुसरा उमरगा तालुक्यातील बेडगा गावचा आहे हे दोन्ही रुग्ण वृद्ध असून दोन्ही मुंबई रिटर्न रुग्ण आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिले दोन कोरोना बळी; दोन्ही रुग्ण मुंबई रिटर्न
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे दोन बळी गेले आहेत. यातील पहिला रुग्ण हा उस्मानाबाद तालुक्यातील कोड या गावातील आहे तर दुसरा उमरगा तालुक्यातील बेडगा गावचा आहे. दोन्ही रुग्ण मुंबई रिटर्न होते.
कोडं येथील रुग्णाचा पूर्वीच मृत्यू झाला आहे, मात्र त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनामुळेच या वृद्धाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरा बेडगा येथील रुग्ण मुंबईच्या कांदिवली भागातून कुटुंबासह बेडगा येथे आला होता. या 60 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उमरगा कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. ते मधुमेह, उच्च रक्तदाब व अन्य आजारानेही त्रस्त होते. मात्र रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला शुक्रवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ही ६२ झाली आहे. यापैकी १३ रुग्ण बरे झाले आहेत तर, ४८ रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर यापैकीच दोघांचा मृत्यू झाला आहे