उस्मानाबाद -अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीलाच संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत गुरुवारपासून खालावली असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तब्येत आता बरी आहे. मी तब्येतीबद्दल संतुष्ट आहे आणि मी कार्यक्रमाला संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, माझी तब्येत आता बरी आहे. डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे. मात्र, मी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तर तीनही दिवस संमेलनाला उपस्थित राहणार का? यावर ते म्हणाले, डॉक्टर जो सल्ला देतील त्याप्रमाणे निर्णय घेणार आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना गुरुवारपासून उदघाटक ना. धो. महानोर यांना काही संघटनांनी धमकीचे फोन केले होते. तसेच संमेलनाचे अध्यक्ष यांचीही तब्येत खालावत असल्याने आता वेगवेगळे तर्क वितर्क लावले होते. मात्र, ते संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर मी सुरक्षेबद्दल कोणतीही मागणी केली नाही. शासन सुरक्षेबद्दल आपली जबाबददारी पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'गोरोबा काका नगरी'मध्ये पार पडणार संमेलन..