उस्मानाबाद - राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी परंडा तालुक्यात रोसा गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा पाढा फडणवीस यांच्या समोर वाचला. तेव्हा शेतकऱ्यांना धीर देत सरकारला मदत करण्यासाठी आम्ही भाग पाडण्याचे आश्वासन दिले.
मदत करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू -देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना धीर देत सरकारला मदत करण्यासाठी आम्ही भाग पाडू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. परतीच्या पावसामुळे सगळी जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे आता या जमिनीला तयार करण्यासाठी माती आणावी लागणार आहे. यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात असून जोपर्यंत माती आणता येणार नाही तोपर्यंत पुढच्या पिकाचा विचार केला जाऊ शकत नाही असे फडणवीस म्हटले आहेत.
परतीच्या पावसामुळे सगळी जमीन खरडून गेली आहे त्यामुळे आता या जमिनीला तयार करण्यासाठी माती आणावी लागणार आहे यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात असून जोपर्यंत माती आणता येणार नाही तोपर्यंत पुढच्या पिकाचा विचार केला जाऊ शकत नाही असेही फडणवीस म्हटले आहेत. शेतकऱ्यांना सरसकट मदत झाली पाहिजे तसेच खरडून गेलेल्या जमिनीसाठी आणि विहिरीतील गाळ काढण्यासाठी सरकारने तात्काळ पैसा उपलब्ध करून द्यावा यासाठी आम्ही आग्रह धरु असे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले.