महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये आढळला पाहिला कोरोनाग्रस्त रुग्ण - उस्मानाबाद कोरोना रुग्ण

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. सध्या रुग्णावर उमरगा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राज गलांडे यांनी दिली.

COVID 19
उस्मानाबादमध्ये आढळला पाहिला कोरोनाग्रस्त रुग्ण

By

Published : Apr 2, 2020, 11:13 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. सध्या रुग्णावर उमरगा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राज गलांडे यांनी दिली. संबंधीत रुग्ण हा दिल्ली आणि पानिपत येथे फिरायला गेला होता. त्यानंतर तो दोन दिवसांपूर्वी उमरगा येथे आला होता.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून फक्त संशयित रुग्ण आढळले होते. मात्र, कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आता सापडला असून उमरगा तालुक्यातील हा रुग्ण पॉझिटिव्ह आहे. रुग्णाच्या पत्नीचा अहवाल आला असून तो निगेटीव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संबंधीत रुग्ण हा दिल्ली आणि पानिपत येथे फिरायला गेला होता. त्यानंतर तो दोन दिवसांपूर्वी उमरगा येथे आला होता. त्यांनतर त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. गुरुवारी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details