महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंटेनरने वृद्धाला चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद - containers-crush-an-old-man

उस्मानाबादमध्ये कंटेनरने एका वृद्धव्यक्तीला चिरडल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी कंटेनर चालका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

containers-crush-an-old-man-in-osmanabad
कंटेनरने वृद्धाला चिरडले घटना सीसीटीव्हीत कैद

By

Published : Mar 3, 2020, 11:31 PM IST

उस्मानाबाद -कंटेनरने चिरडल्याने शहरातील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या सर्वोत्तम अनसिंगकर (वय.७७) असे आहे.

कंटेनरने वृद्धाला चिरडले घटना सीसीटीव्हीत कैद

जोशी गल्ली येथे राहणारे अनसिंगकर तुळजापूर रोड लगत असलेल्या भारत टॉकीज जवळून रस्त्याने चालत घराकडे निघाले होते. यावेळी सोलापूर वरून येणाऱ्या कंटेनरच्या मागच्या चाकाखाली ते चिरडले गेले. ही घटना सोमवारी घडली असून हा अपघात सी.सी.टीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी चालक कंटेनर (एम.एच.0४ डीडी ४८१७) निष्काळजीपणे चालवला म्हणून शहर पोलीस ठाण्यात राहुल पाडमुख (रा.चिखली) बुलढाणा येथील कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details