उस्मानाबाद - राज्याच्या राजकारणात राजकीयदृष्टया संवेदनशील असणारा जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 4 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2, काँग्रेसकडे 1 तर शिवसेनेने 1 जागा मिळवली होती. जिल्ह्यातील जेष्ट नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर झालेला हल्ल्यामुळे हा जिल्हा चर्चेत राहिला. शिवसनेचे मंत्री तानाजी सावंत देखील निवडणूक रिंगणात आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा असे एकुण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद मतदारसंघात विधानसभेला 2014 च्या तुलनेत मतादानात घट झाली आहे. तर परंडा मतदारसंघात टक्केवारी वाढली आहे.
मतदारसंघ | आमदार | पक्ष | 2014 ची टक्केवारी | 2019 ची टक्केवारी |
उमरगा (राखीव) | ज्ञानराज चौगुले | शिवसेना | 57.57 | 56.43 |
तुळजापूर | मधुकरराव चव्हाण | काँग्रेस | 65.62 | 64.46 |
उस्मानाबाद | राणाजगजितसिंह पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस | 66.09 | 60.71 |
परंडा | राहूल मोटे | राष्ट्रवादी काँग्रेस | 66.82 | 68.10 |
उमरगा (राखीव) - अनुसुचीत जाती -
2009 पासून हा मतदासंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात काँग्रेसचे रोहिदास भालेराव तर वंचितचे रमाकांत गायकवाड यावेळी रिंगणात आहेत. शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले दोन वेळा विजयी झाले आहेत. त्यांनी 2014 मध्ये किसन कांबळे तर 2009 मध्ये डॉ.बाबुराव गायकवाड यांचा पराभव केला होता.
तुळजापूर मतदारसंघ -