उस्मानाबाद -मराठा आरक्षणासाठी तुळजापूर येथे मोर्चा आयोजित करणाऱ्या समनव्यकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा पेटला होता.
तुळजापुरात मराठा आरक्षणासाठी मोर्चा आयोजित करणाऱ्या सात आयोजकांवर गुन्हा दाखल
तुळजापूर येथे 9 ऑक्टोंबर रोजी मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सहभाग घेतला होता.
त्यामुळे तुळजापूर येथे 9 ऑक्टोंबर रोजी मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सहभाग घेतला होता. आयोजित मराठा आरक्षण मोर्चात सुमारे 2 हजार 500 लोकांची गर्दी जमली होती. या गर्दीतील अनेकांनी मास्क लावला नव्हता. त्याचबरोबर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. त्यामुळे निष्काळजीपणाचे कृत्य करून कोरोना प्रसाराची शक्यता निर्माण केली आहे.
त्यामुळे मोर्चा आयोजन करणाऱ्या 7 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आयोजक सज्जन साळुंके, जीवन इंगळे, अर्जुन साळुंके, महेश डोंगरे, धैर्यशील पाटील, सुनिल नागने, अजय साळुंके यांच्याविरुद्ध कलम- 188, 269, 270 आणि म.पो.का. कलम- 135 अन्वये गुन्हा पोलीस प्रशासनाने नोंदवला आहे.