उस्मानाबाद- कोरोना व्हायरसचा थैमान भारतातही पाय रोवत आहे. चीनमध्ये या व्हायरसने अनेकांचा बळी घेतला आहे. चिकनमुळे कोरोना होतो, अशी अफवा पसरविण्यात आली होती. त्यामुळे पोल्ट्री फार्म व्यवसायिकांचे लाखोंचा नुकसान आहे.त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांवर संकट आले आहे.
अफवेने पोल्ट्री व्यवसायावर संकट अफवेमुळे अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. सध्या पोल्ट्री व्यवसायिकांकडून ठोक व्यापारी 7 रुपये किलोने कोंबडी घेत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. ती कोंबडी किरकोळ विक्रेत्याला 15 रूपये विकली जाते आणि किरकोळ विक्रेते ग्राहकाला 100 रुपये किलोने विकतात.
पोल्ट्री व्यावसायिकाला येणारा खर्च
पोल्ट्री व्यावसायिक एक कोंबडी 20 रुपयांना खरेदी करतात. या कोंबडीला 45 दिवस वाढवले जाते. या 45 दिवसांमध्ये कोंबडीच्या खाद्यावर आणि औषधावर जवळपास 100 ते 150 रुपये खर्च येतो 45 दिवसानंतर साधारणपणे 3 किलोपर्यंत या पक्षाची वाढ झाल्यानंतर याची विक्री केली जाते. तीन किलोग्रॅमची एक कोंबडी 250 रुपयांना पोल्ट्री व्यवसायीकांकडून विकली जाते. मात्र, कोरोनाच्या भीतीने याची विक्री मंदावली असून आज पोल्ट्री व्यवसायीक एक कोंबडी 7 रूपयाला तर किरकोळ व्यापाऱ्यांकडून 100 रूपये किलो दराने चिकन विकले जाते आहे.
हेही वाचा -'कोरोना'ची धास्ती ! 'हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे' उरुसानिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द