उस्मानाबाद - वाढत्या कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनची आहे. एकीकडे सर्वकाही ठप्प असताना मंत्र्यांच्या शेतामध्येच आठवडी बाजार भरत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. यामुळे शेकडो शेतकरी एकवटत असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील जवळा (दु) शिवारातील मंत्री नवाब मलिक यांच्या शेतामध्ये चक्क शेळी-बोकडांचा बाजार भरत असल्याचा आरोपही काळे यांनी केला आहे.
'कोरोना काळातही मंत्री नवाब मलिक यांच्या शेतात भरतो आठवडी बाजार'
ग्रामीण भागात रुग्ण वाढत असतानाच मंत्री नवाब मलिक यांच्या शेतामध्ये चक्क आठवडी बाजार भरत आहे. सोमवारी मध्यरात्री सुरू झालेला बाजार मंगळवारी सकाळपर्यंत सुरू असतो. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील जवळा (दु) तसेच लगतच्या शिवारात कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या पत्नी मेहजन नवाब मलिक, मुलगी सना नवाब मलिक, मुलगा फराज नवाब मलिक यांच्या नावे शेतजमीन आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे उस्मानाबाद तालुक्यात आहेत. कोरोनामुळे दिवसाकाठी 20 ते 25 जणांचा मृत्यू होत आहे. ग्रामीण भागात रुग्ण वाढत असतानाच मंत्री नवाब मलिक यांच्या शेतामध्ये चक्क आठवडी बाजार भरत आहे. सोमवारी मध्यरात्री सुरू झालेला बाजार मंगळवारी सकाळपर्यंत सुरू असतो. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या कृपेनेच हा आठवडी बाजार भरत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे त्वरित कारवाई करून नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा, अशी मागणीही नितीन काळे यांनी केली आहे.