उस्मानाबाद- जिल्ह्यातील अपसिंगा येथे सहा एकर केळीच्या बागेल आग लागून बाग जळून खाक झाली आहे. विजेच्या तारा एकमेकांना चिटकून शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली आहे. तुळजापूर तालुक्यातील अपसिंग येथील माजी तालुका कृषी अधिकारी हनुमंत रामहरी गोरे यांची ही बाग आहे. या आगीमुळे गोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग; ६ एकर केळीची बाग जळून खाक - केळीची बाग
या आगील गोरे यांचे अंदाजे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
६ एकर केळीची बाग जळून खाक
गोरे यांच्या शेतावरून ११ केव्हीच्या विजेच्या तारा गेल्या आहेत. या तारांचे घर्षन होऊन ठिणग्या पडल्या आणि त्यानंतर लागलेल्या आगीत सहा एकरावरील केळीची बाग जळून खाक झाली आहे. या आगील गोरे यांचे अंदाजे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये केळीची लागवड केली होती. सध्या शेतात १५ टन माल शिल्लक होता.
त्यामुळे संबधीत विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गोरे यांनी केली आहे.