उस्मानाबाद-कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्वजण थोडे बहुत आर्थिक सहाय्य करत आहेत. मोठ्या उद्योगपतींपासून ते सर्वसामान्य लोक आपापल्यापरीने मुख्यमंत्री साहय्यता निधीमध्ये पैसे जमा करत आहेत. असाच निधी नवदाम्पत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.
स्तुत्य उपक्रम.. लग्न सोहळ्यातील अनावश्यक खर्चाला फाटा, नवदाम्पत्याची मुख्यमंत्री साहय्यता निधीला मदत - लग्न सोहळ्यातील अनावश्यक खर्चाला फाटा
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील नवविवाहीत दाम्पत्याने आपल्या विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्चाला फाट देत त्यातून बचत झालेले पेसै मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले.
नवदाम्पत्याची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील परमेश्वर भारत जाधव व राजश्री वामन शेटे या नवदांपत्यांने लग्न कार्यातील अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक अंतर व इतर सर्व नियम पाळून आई-वडील यांच्या उपस्थितीत घरीच लग्नकार्य केले. यातून बचत झालेले पैसे मुख्यमंत्री साहय्यता निधीमध्ये जमा केले हे दोघेही उच्चशिक्षित असून कोरोनाग्रस्तासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून 11 हजार 100 रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला.