उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जवळपास चौदा लोकांना आपला जीव गमवावा लागला असून या विषाणूमुळे मृत झालेल्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या तरुणाने रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड केली जात असल्याचे आरोप केला आहे. हा तरुण काल 5 जुलैला मृत झाला असून त्याचा व्हिडिओ आज व्हायरल होतो आहे.
बघा, कोरोनाग्रस्त तरुणाचा अखेरच्या क्षणांचा व्हिडिओ, रुग्णांची हेळसांड चव्हाट्यावर - osmanabad corona patient viral video news
मी उस्मानाबाद येथे कोविड १९ वर उपचार घेत आहे. तरी माझे हातपाय गळाटत असून मला सारखं सारखं दम लागत आहे. या रुग्णालयात डॉक्टर इलाज करत आहेत. मात्र उपचारासाठी उशीर करत आहेत. त्याच बरोबर रात्री ऑक्सिजन बंद करतात अस म्हटलं असून रात्री डॉक्टर नसतात, असा गंभीर आरोप केला आहे.
तो रुग्ण परंडा तालुक्यातील आसू गावचा रहिवासी असून, मी कुठेही गेलेलो नाही. तरीदेखील मला कोरोनाची लागण झाली असून, मी उस्मानाबाद येथे कोविड १९ वर उपचार घेत आहे. तरी माझे हातपाय गळाटत असून मला सारखं सारखं दम लागत आहे. या रुग्णालयात डॉक्टर इलाज करत आहेत. मात्र उपचारासाठी उशीर करत आहेत. त्याच बरोबर रात्री ऑक्सिजन बंद करतात अस म्हटलं असून रात्री डॉक्टर नसतात, असा गंभीर आरोप केला आहे. रुग्ण म्हणत होता, की धापा आणि हातापायाचा इलाज झाला तर चांगले होईल. या सर्व गोष्टी कलेक्टर साहेबांना सांगा, असेही त्याने व्हिडिओत म्हटले आहे.