महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद' यात्रा उस्मानाबादमध्ये - loksabha

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेली जन आशीर्वाद यात्रा बुधवारी उस्मानाबाद येथे आली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप केले

आदित्य ठाकरे

By

Published : Aug 1, 2019, 8:03 AM IST

उस्मानाबाद- युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेली जन आशीर्वाद यात्रा बुधवारी उस्मानाबाद येथे आली. यावेळी त्यांनी परंडा येथे जनतेशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांचा हा तिसरा दौरा असून मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा आलो असल्याचे ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे जनावरांना चारा देण्यासाठी उस्मानाबाद येथे आले होते. त्यानंतर दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी ठाकरे यांनी उस्मानाबाद दौरा केला. मी कुठलाही राजकीय हेतू ठेवून आलो नाही. निवडणुका अद्यापही लांब आहेत. मात्र, तुम्ही आम्हाला भरघोस मतांनी लोकसभेच्या वेळी निवडून दिले त्याचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप केले. या दौऱ्यानिमित्त सचिन अहिर व उस्मानाबादचे नवनियुक्त पालकमंत्री तानाजी सावंत, त्याचबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details