उस्मानाबाद - दुष्काळ गंभीर शिवसेना खंभीरचा नारा देत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मागील २ दिवसांपासून दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शहरातील छायादीप लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात कर्ज माफीची मागणी केली. तसेच त्यांनी संपूर्णपणे सरसकट कर्ज मुक्ती झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे - आदित्य ठाकरे
दुष्काळ गंभीर शिवसेना खंभीरचा नारा देत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मागील २ दिवसांपासून दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत.
या कार्यक्रमात शेतकरी महिलांना शिलाई मशीनसह पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप करण्यात आले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या पत्नींना शेळ्यांचे वाटपही करण्यात आले. आदित्य ठाकरे गेली २ दिवस जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याचे टाक्यांचे वाटप करत आहेत.
आपण पाण्याच्या टाक्यासोबत त्यात पाणीही देणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वासही यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवला. तसेच त्यांनी मी शहरातील आहे. त्यामुळे मला शेतीमधील काही कळत नाही. तरीही मी आपले दुःख पाहून तुम्हाला भेटायला आल्याचे सांगितले.