उस्मानाबाद - कोरोना नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन केल्याने तुळजाभवानी देवीच्या २४ पुजाऱ्यांवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने कारवाई केली आहे. ८ पुजाऱ्यांना ३ महिने मंदिर प्रवेश बंदी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत, तर इतर १६ पुजाऱ्यांना ६ महिन्यासाठी मंदिर प्रवेश बंदी का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन केल्याने देऊळ ए कवायत कायदानुसार ही कारवाई करण्यात आली असून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही प्रवेशबंदीची कारवाई केली आहे.
तुळजाभवानी देवीच्या २४ पुजाऱ्यावर कारवाई या पुजाऱ्यांचा आहे समावेश
अभिजीत कुतवळ, कुलदीप औटी, पंकज कदम, संपत गंगणे, संदीप टोले, लखन भोसले,ओंकार भिसे आकाश परदेशी या ८ पुजाऱ्यांना ३ महिने मंदिर प्रवेश बंदी केली असून ६ महिने मंदिर प्रवेश बंदी का वाढवू नये अशी नोटीस बजावली आहे. मंदिरात पूजेची पाळी नसतानाही तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात विनापरवाना प्रवेश केल्या प्रकरणी १६ पुजाऱ्यांना ६ महिने मंदिर प्रवेश का करू नये अशी नोटीस बजावली असून यात सत्यजित कदम, विशाल सोंजी, शशिकांत पाटील, अक्षय कदम, अथर्व कदम, शशिकांत कदम- परमेश्वर, बुवासाहेब पाटील, सौरभ कदम- परमेश्वर, सुहास कदम, आकाश कदम, आनंद पाटील, नेताजी पाटील, विशाल पाटील, दिनेश परमेश्वर, सार्थक मलबा व सुहास कदम यांचा समावेश आहे.
हेही वाचा - हवाईदलाचे मिग-२९ अपघातग्रस्त; वैमानिकाला वाचवण्यात यश