उस्मानाबाद- नातवावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी १ हजारांची लाच स्विकारताना एका पोलिस नाईकासह स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. नळदुर्ग पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर असलेल्या या पोलिसाने ४ तक्रारदाराकडे गुन्हा मागे घेण्यासाठी ४ हजारांची लाच मागितली होती. त्यापैकी १ हजारांची लाच स्विकारताना पोलीस शिपायासह स्थानिक पत्रकारावराला रंगेहात पकडण्यात आले.
उस्मानाबादेत पत्रकार आणि पोलिसावर एक हजारांची लाच स्वीकारताना कारवाई - osmanabad
गुन्हा मागे घेण्यासह प्रकरण वरिष्ठांना सांगून दडपून टाकण्यासाठी ४ हजारांच्या लाचेची पोलिसाकडून मागणी करण्यात आली होती. यात स्थानिक पत्रकारही मध्यस्थी म्हणून काम करत होता.
ही कारवाई ७ डिसेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यातील (बिट अ) रूमध्ये करण्यात आली. तक्रारदारांच्या नातावावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठी व प्रकरण वरिष्ठांना सांगून बंद करण्यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक यांनी ४ हजार रूपयाची लाच मांगितली. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आपली तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्त तक्रारीची शहानिशा करून त्यानंतर उस्मानाबाद एसीबीद्वारे सापळा रचून लाचखोर पोलीस नाईक यांना १ हजार रूपये स्विकारताना रंगेहाथ पकडले.
या गुन्ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक वृत्तावाहिनीच्या पत्रकारावरही या प्रकरणी कारवाई करण्यात आली. या दोघांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.