उस्मानाबाद- आपल्या मेंढ्यांसह उपजीविकेसाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांवर शुक्रवारी मोठे संकट कोसळले. अज्ञात कारणामुळे मेंढपाळांच्या 78 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तेर जवळ असलेल्या हिंगळजवाडी येथील ही घटना आहे. यात दाजी माणिक गोरड, पोपट गोरड (रा.गोरडवाडी ता.माळशिरस), दत्तु शेळके (रा. पठाण मांडवा) या मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.
मेंढपाळांच्या 78 मेंढ्याचा अचानक मृत्यू, कारण अस्पष्ट - died
आपल्या मेंढ्यांसह उपजीविकेसाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांवर शुक्रवारी मोठे संकट कोसळले. अज्ञात कारणामुळे मेंढपाळांच्या 78 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
बीड, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मेंढपाळ मेंढ्यांसह उपजीविकेसाठी भटकंती करतात. गुरुवारी ते उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे आपल्या मेंढ्या घेऊन मुक्कामी आले होते. याठिकाणी पाल्यातून विषबाधा झाल्याने मेंढयांचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता असली तरी अद्याप कारण अस्पष्ट आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव यांना यासंबंधी माहिती मिळताच पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने तात्काळ मेंढ्यांवर उपचार करण्यास सुरुवात केली. इतर मेंढ्यांना औषधोपचार देण्यात आले आहे.