नाशिक - जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसूल गावातील दाद मळा वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेच्या १९ विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा झाल्याची घटना घडली. सर्व विद्यार्थ्यांना नगरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशकात जिल्हा परिषदेच्या १९ विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा; उपचार सुरू - Poison
दुध प्यायल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना दुधातून विषबाधा झाल्याचा अंदाज त्यांच्या पालकांनी व्यक्त केला. तसेच सर्वांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने अनर्थ टळला.
उपचार घेताना विद्यार्थी
नगरसूल गावात दाद मळा वस्ती येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत ५ ते ७ वयोगटातील मुलांना पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी देखील पोषण आहारात मिळणारी खिचडी खाल्ली. त्यानंतर त्यांना दुध वाटप करण्यात आले. हेच दुध प्यायल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना दुधातून विषबाधा झाल्याचा अंदाज त्यांच्या पालकांनी व्यक्त केला. तसेच सर्वांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने अनर्थ टळला.