महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक: किल्ल्यावर फिरायला गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू - रामशेज किल्ला

मित्रांनी रितेशला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत उचलून आणले त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे रितेशला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

death
रितेश पाटील

By

Published : Aug 21, 2020, 12:48 AM IST

नाशिक -दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील रितेश समाधान पाटील (१७) हा युवक आपल्या मित्रांबरोबर आशेवाडी येथील रामशेज किल्ल्यावर फिरायला गेला असता किल्ल्यावरील पाण्याच्या कुंडात पाय घसरून पडल्याने डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीत मृत्यू झाला. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील पत्रकार समाधान छबू पाटील यांचा मुलगा रितेश समाधान पाटील (१७) हा आपल्या मित्रांसोबत रामशेज किल्ल्यावर फिरायला गेला होता. यावेळी रामशेज किल्ल्यावर पोहोचल्यानंतर तो तेथील पाण्याच्या कुंडाजवळ गेला असता पाय घसरून पडला. त्यावेळी त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूस गंभीर दुखापत झाली. युवकांच्या सहकार्याने त्याला पाण्याच्या कुंडातून बाहेर काढण्यात आले.

मित्रांनी रितेशला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत उचलून आणले त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे रितेशला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details