नाशिक - सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाने थेट तो विषारी कोब्राच (नाग) रुग्णालयात आणल्याची घटना चांदवडमध्ये घडली आहे. सर्प दंशानंतर डॉक्टरांना उपचार करणे सोपे जावे, यासाठी त्या युवकाने जिवंत कोब्रा पकडून एका बरणीत घातला आणि चांदवडचे उपजिल्हा रुग्णालय गाठले. संतोष शिंदे असे सर्पदंश झालेल्या युवकाचे नाव आहे. हा सर्व प्रकार पाहून क्षणभर डॉक्टरांनी भुवया उंचावल्या होत्या.
चावलेला विषारी कोब्रा घेऊनच 'तो' युवक रुग्णालयात दाखल - जिल्हा रुग्णालय
सर्पदंश झालेल्या युवकाने, चावलेल्या सापाची जात ओळखून योग्य उपचार व्हावेत यासाठी जिवंत कोब्रा बरणीत टाकून उपजिल्हा रुग्णालय गाठले.
सर्पदंश झालेला युवक - संतोष शिंदे
संतोष शिंदे यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमराज दळवी यांनी उपचार केले. मात्र संतोषला जास्त त्रास होऊ लागल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सर्पदंश झालेल्या युवकाने थेट कोब्रा सोबत आणल्याने, रुग्णालय परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.