नाशिक -येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा लिलाव सुरू असताना लिलाव झालेल्या ट्रॅक्टरमध्ये कांदा भरणारा मजूर अनिस पठाण हा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली आला. या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने काही काळ कृषी उत्पन्न बाजार समितीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे संतप्त मजुरांनी काही काळ कांदा लिलाव बंद पाडला होता. या प्रकरणानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आधिक तपास सुरू झाला आहे.
येवल्यात कांद्याच्या ट्रॅक्टर खाली चिरडून तरुण मजूर ठार
नाशिक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा लिलाव सुरू असताना लिलाव झालेल्या ट्रॅक्टरमध्ये कांदा भरणाऱ्या मजूराचा ट्रॅक्टर खाली चिरडून मृत्यू झाला. या प्रकरणी आधीक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - नाशकात पोलिसाची गुंडगिरी, फुकटात दारूची बाटली दिली नाही म्हणून बारमालकाला मारहाण
बाबत अधिक माहिती अशी की, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा लिलाव झाल्यानंतर खाली पडलेले कांदे अनिस हारून पठाण (वय ३०, रा. कौठखेडे) हे भरत होते.याचवेळी संबधीत कांदे भरलेला ट्रॅक्टर मागे घेतला जात होता. या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीखाली आल्याने पठाण यांचा मृत्यू झाला. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्या आगोदर त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील ट्रॅक्टर कोळम येथील असल्याची चर्चा आहे.