महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यात लसीकरणला तोबा गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - येवला

येवला येथे स्वामी मुक्तांनंद विद्यालयात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे .मात्र, या लसीकरण प्रसंगी लोकांनी तोबा गर्दी केली असून सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र बघण्यास मिळाले.

येवल्यात लसीकरणाला गर्दी
येवल्यात लसीकरणाला गर्दी

By

Published : May 8, 2021, 2:31 PM IST

येवला -येवला येथे स्वामी मुक्तानंद विद्यालयात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे .मात्र, या लसीकरण प्रसंगी लोकांनी तोबा गर्दी केली असून सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र बघण्यास मिळाले.

येवल्यात लसीकरणला तोबा गर्दी
नियोजनाचा अभाव....
लसीकरणाकरता नागरिक गेल्या दोन दिवसापासून चकरा मारत असून यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. मात्र, लस उपलब्ध नाही. , लस आज तुम्हाला दिली जाणार नाही, असे कारण सांगून परत ज्येष्ठ नागरिकांना माघारी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे लस कधी मिळणार याचे नियोजन नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे .

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
ऑनलाइन नोंदणीप्रमाणे लसीकरण...
आज पासून 18 ते 44 वयोगटाच्या नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली. येवला उपजिल्हा रुग्णालय जवळच असलेल्या स्वामी मुक्तानंद विद्यालय हे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details