महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यात 6 दुकानदारांसह व 300 वाहनधारकांवर कारवाई - corona update

येवल्यात विनापरवानगी दुकाने सुरू केल्यामुळे पोलिसांनी 6 दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच विनाकारण शहरात फिरणाऱ्या 35 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Yeola police action against vehicle owners and shopkeepers
येवल्यात 6 दुकानदारांसह व 300 वाहनधारकांवर कारवाई...

By

Published : Apr 23, 2020, 8:56 PM IST

नाशिक - येवल्यात विनापरवानगी दुकाने सुरू केल्यामुळे पोलिसांनी 6 दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच विनाकारण शहरात फिरणाऱ्या 35 जणांवर दंडात्मक कारवाई केली असून, आतापर्यंत 300 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे.

येवल्यात 6 दुकानदारांसह व 300 वाहनधारकांवर कारवाई...

शहरात दुकाने उघडण्याचे कोणतेही आदेश नसताना शेतीशी निगडीत असल्याचे सांगून ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिकल, मोटर रिवाइंडिंग, बांधकाम क्षेत्रातील साहित्य अशी अनेकांनी दुकाने उघडली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड महामार्गावर कारवाई करत दुकाने उघडी ठेवणाऱ्या 6 जणांवर आपत्ती व्यवस्थापनाचा भंग तसेच जमावबंदी आदेशाचा भंग अशा इतर कारणामुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .याशिवाय विनाकारण शहरात दुचाकीवर फिरणाऱ्यांची संख्या दोन दिवसापासून वाढल्याने 35 दुचाकीस्वारांवरही कारवाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details