येवला (नाशिक) - गणेश उत्सव दोन महिन्यांवर आल्याने येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील मूर्तिकाराने कारखान्यांमध्ये चार ते साडेचार हजारपर्यंत मोठ्या व लहान आकाराच्या गणेशमूर्ती तयार करून ठेवल्या आहे. मूर्तिकार दत्तू रसाळ हे दरवर्षी नाशिक, मालेगाव, सिन्नर, पुणे, नगर येथे ऑर्डर घेऊन गणेशमूर्तीचा पुरवठा करतात. मात्र, त्यांना अजून एकही ऑर्डर मिळालेली नाही. त्यांनी तर दिवाळी पासूनच गणेश मूर्तीचे काम सुरू करून ठेवले आहे. आजच्या घडीला त्यांच्या कारखान्यांमध्ये साडेचार हजारहून अधिक गणेश मूर्ती तयार आहेत. त्यांना रंगवण्याचे कामही चालू आहे.
गणेश मूर्तिकार संकटात, ऑर्डर मिळण्याच्या आशेवर कारागीर मूर्ती बनवण्यात मग्न
मूर्तिकार दत्तू यांनी मूर्तींसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी घरातील स्त्रियांचे सोने गहाण ठेवले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे लॉकडाऊन असेच राहिले तर गणेश मूर्ती विकल्या जातील की नाही, गुंतवलेले भांडवल निघेल की नाही आणि ते गहाण ठेवलेले सोने सोडवणे तर सोडाच परंतु त्यांची रोजंदारीही सुटते की नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.
गणेश मूर्तींच्या कामांमध्ये त्यांना संपूर्ण परिवार दिवाळीपासून मदत करत आहे. त्यांनी मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी घरातील स्त्रियांचे सोने देखील गहाण ठेवले आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे लॉकडाऊन असेच राहिले तर गणेश मूर्ती विकल्या जातील की नाही, गुंतवलेले भांडवल निघेल की नाही आणि ते गहाण ठेवलेले सोने सोडवणे तर सोडाच परंतु त्यांची रोजंदारीही सुटते की नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका आता या गणेश मूर्तिकारांनाही बसतो की कायस असा प्रश्न निर्माण झाला आहे.