नाशिक - महिलांचे व्हॉटसअॅप ग्रुप हॅकिंगचा नवीन प्रकार समोर आला आहे. यामध्ये शहरातील नामांकित आणि विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या ग्रुपमध्ये अचानक काही व्यक्ती अॅड झाल्या. त्यांनी अश्लील व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली. या प्रकरणाची माहिती एकमेकांना व्हावी यासाठी ग्रुपमधील महिलांनी एकमेकींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
नाशिकमध्ये महिलांचे व्हॉटसअॅप ग्रुप हॅक; पाठवले अश्लील व्हिडिओ - Woots App
ग्रुपमध्ये सुरुवातीपासूनच सगळ्या ओळखीच्या व्यक्तीचा समावेश असताना अचानक अनोळखी व्यक्ती अॅड झाली. प्रथमदर्शनीच ग्रुपची लिंक हॅक झाल्याने हा प्रकार घडला असावा, असे लक्षात आले. मात्र, शहानिशा केली असता कुणीतरी जाणीवपूर्वक फक्त महिलांच्याच ग्रुपमध्ये, अशा प्रकारे शिरकाव करत असल्याचे लक्षात येत आहे.
या ग्रुपमध्ये सुरुवातीपासून सगळ्या ओळखीच्या व्यक्तीचा समावेश असताना अचानक अनोळखी व्यक्ती अॅड झाली. प्रथमदर्शनीच ग्रुपची लिंक हॅक झाल्याने हा प्रकार घडला असावा, असे लक्षात आले. मात्र, शहानिशा केली असता कोणीतरी जाणीवपूर्वक फक्त महिलांच्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे शिरकाव करत असल्याचे लक्षात येत आहे. या ग्रुपमध्ये असलेल्या महिलांना त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवर अनोळखी क्रमांकावरून मेसेज यायला सुरुवात झाली होती. या मेसेजमध्ये त्या व्यक्तीने ओम असे नाव सांगून आपण पाकिस्तानचा असल्याचे सांगितले. हा क्रमांक 92 ने सुरु होणारा आहे, तर दुसरा क्रमांकावरून सारख्याच नावाने कर्नाटकातून बोलत असल्याचे सांगितले. महिलांचे फोन लागत नसल्याने नेटवर्किंग हॅकिंगचा प्रकार आहे, की काय अशी शंका व्यक्त केली गेली. यानंतर ग्रुपमधील महिलांनी नाशिकच्या सायबर क्राईम पोलिसात तक्रार नोंदवली आहे.