नाशिक- कौटुंबिक वादातून एका महिलेने पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशकात पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न - रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न
आई-मुलीच्या वादात आईने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारत घडली असून महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पेटवून घेतलेली महिला
दरम्यान, मुलगी व आईमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. अधिक तपास पंचवटी पोलीस करीत आहे.
हेही वाचा - मनमाडला खंडेराव यात्रोत्सवला सुरुवात; बारा गाड्या ओढून यात्रा सुरू