महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Witchcraft On Girl Photo: तरुणीच्या फोटोवर अरबी भाषेत मंत्र लिहून लटकावला झाडाला; अघोरी विद्येचा प्रयत्न - तरुणीच्या फोटोवर जादूटोणा

Witchcraft On Girl Photo तरुणीच्या फोटोवर अरबी भाषेत मंत्र लिहून जादूटोणा केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात घडली आहे. तरुणीचा फोटो एका लिंबाच्या झाडाला अटकविण्यात आला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पोलिसांना या ठिकाणी पाचारण केले. (Witchcraft on girl photo) (Mantra written on girl photo) (Superstition Eradication Committee)

Witchcraft On Girl Photo
झाडावर टांगलेला फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 9:13 PM IST

तरुणीच्या फोटोवर लिहिलेल्या मंत्राविषयी सांगताना नागरिक

नाशिक (येवला):Witchcraft On Girl Photo एकीकडे भारताने चंद्रयान ३ हे चंद्रावर पाठवले असताना दुसरीकडे आजही समाजामध्ये अंधश्रद्धा काही नागरिकांमध्ये दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवल्यात देखील एका झाडावर तरुणीच्या फोटोवर अशाच प्रकारे अघोरी प्रयोग झाल्याचं उघडकीस आले आहेत. (Witchcraft on girl photo) (Mantra written on girl photo) (Girl photo hung on tree) (Superstition Eradication Committee)

अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस:तरुणीच्या फोटोवर अरबी भाषेत मंत्र लिहून अघोरी विद्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार येवला शहरात उघडकीस आला आहे. येवला शहरातील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी शेजारील लिंबाच्या झाडाला एका तरुणीचा फोटो लावून अरबी भाषेतील चिठ्ठीमध्ये मंत्र लिहिलेले साहित्य परिसरातील नागरिकांना आढळून आले होते. याची तक्रार त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना देखील या ठिकाणी पाचारण केले. हा सर्व प्रकार जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन असून संबंधित अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने येवला शहर पोलिसांकडे केली आहे.


फोटोवर काय लिहिलं आहे?झाडाला अटकवलेल्या फोटोमागे अरबी, उर्दू भाषेमध्ये मजकूर लिहिलेला असताना यामध्ये यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी हा मजकूर वाचला. यात एका मुलीचे व एका मुलाचे नाव लिहिले आहे. "तुझे काम झालेले आहे. तू परत घरी परत ये "अशाप्रकारे यामध्ये मजकूर लिहिला होता. या मजकुराच्या पुढील बाजूस एका मुलीचा फोटो देखील लावण्यात आला होता. नक्कीच हा अघोरी विद्येचाच प्रकार असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्ते आयुब शहा यांनी सांगितलं.


अंधश्रद्धा समिती आजही देते लढा:नरेंद्र दाभोलकर विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ. स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती' ही संघटना स्थापली. त्या माध्यमातून अनेक समाजामध्ये अंधश्रद्धा या त्यांनी मोडीत काढल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील पुण्यात गोळ्या घालून हत्या देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या समितीतील अनेक पदाधिकारी व सदस्य या अंधश्रद्धेबाबत आजही लढा देत आहेत. अनेक ठिकाणी अनेक जण बळी देखील पडत असल्याने त्यांच्या पाठीमागे ही समिती उभीदेखील राहत असल्याचं दिसून येते.

हेही वाचा:

  1. Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्राची स्थापना करणे भोवले; एकावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा
  2. Pune Crime : पुत्रप्राप्ती, भरभराटीसाठी अघोरी पूजा करणाऱ्यांवर कडक कारवाई करा- रूपाली चाकणकरांचे पोलिसांनाआदेश
  3. Financial Fraud With Woman: तंत्रमंत्राद्वारे मतिमंद दिराच्या उपचाराचा दावा करत महिलेची लाखो रुपयांनी फसवणूक

ABOUT THE AUTHOR

...view details