येवला ( नाशिक) - दुष्काळी येवला तालुक्यात यंदा जोरदार पाऊस होऊनही तालुक्यात पाणी टंचाईची ( Water Shortage In Yeola ) तीव्रता वाढत आहे. सद्यस्थितीत 13 गावाची तहान 7 टँकरद्वारे 18 खेपाद्वारे रोज भागवली जात असून ( Water Tanker Provide To Yeola Village ) १४ वाडे आणि २ गावांच्या टँकरचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित असल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिली आहे.
7 टँकरद्वारे पाणीपुरवठा -येवला तालुक्याच्या पूर्व भागामध्ये टँकरची मागणी असते. जानेवारीपासूनच ही मागणी सुरू होते. मात्र, यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाण्याच्या टँकरची मागणी आजच्या घडीला 13 गावे व दोन वाड्या अशा 15 गावांसाठी 7 टँकरद्वारे 18 खेपा करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.