महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नाशिकरांचे पाणी कपातीचे संकट टळणार

सतत धार पाऊसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणं 79 टक्के भरलं आहे.तर दारणा धरण 87 टक्के भरले असून ह्यातून 9 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

By

Published : Jul 29, 2019, 3:28 PM IST

गोदावरी नदी

नाशिक - शहरासह जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी पेठ, सुरगाणा या भागात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणं 79 टक्के भरलं आहे. तर दारणा धरण 87 टक्के भरले असून यातून 9 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ


तर नांदुरमध्यमेश्वर धरण 98 टक्के भरले असून आतापर्यंत या धरणातून 23 हजार 959 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हे सर्व पाणी जायकवाडी धरणात जात असून दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या मराठावाड्याला काही प्रमाणत नक्कीच दिलासा मिळणार आहे.


गंगापूर धरण 80 टक्के भरल्यानंतर या मधून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनने सांगितले आहे. तसेच यामुळे नाशिकचे पाणी कपातीचे संकट दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. असे असले तरीही नाशिक जिल्ह्यातील 10 तालुके अजून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात येणाऱ्या दोन दिवसात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details