महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याला शासनाने परवानगी द्यावी - ह.भ.प. संजय नाना धोंगडे

संत निवृत्ती महाराज यांचा पालखी सोहळा 30 दिवसांवर आला आहे. मुक्ताईचा पालखी सोहळा 22 दिवसांवर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेत आषाढी वारीबाबत स्पष्टता लवकर जाहीर करावी, अशी मागणी संत निवृत्ती महाराज संस्थेचे माजी अध्यक्ष व तत्कालीन विश्वस्त संजय नाना धोंडगे व नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातून केली जात आहे.

By

Published : May 6, 2020, 2:12 PM IST

हभप संजय नाना धोंगडे
हभप संजय नाना धोंगडे

नाशिक - आषाढी वारी सोहळ्याची ओढ तमाम वारकरी बांधवांना लागली आहे. परंतू यावर्षी कोरोना विषाणूच्या महाभयकंर संकटामुळे सर्व कार्यक्रम, सोहळे रद्द करण्यात आले आहे. मात्र, ७०० वर्षाची परंपरा शासनाने मोडीत न काढता आषाढी वारी काढण्याची त्वरित परवानगी द्यावी असे वारकरी संप्रदायाचे किर्तनकार संजय नाना धोंगडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हभप संजय नाना धोंगडे

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा तोंडावर आलेला असताना कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे आषाढी वारीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून स्पष्ट सूचना मिळत नसल्याने पालखी सोहळा प्रमुखांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. माऊलींचे मोठे बंधू व सद्गुरु संत निवृत्ती महाराज यांचा पालखी सोहळा 30 दिवसांवर आला आहे. मुक्ताईचा पालखी सोहळा 22 दिवसांवर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेत आषाढी वारीबाबत स्पष्टता लवकर जाहीर करावी, अशी मागणी संत निवृत्ती महाराज संस्थेचे माजी अध्यक्ष व तत्कालीन विश्वस्त संजय नाना धोंडगे व नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातून केली जात आहे.

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरकडे प्रस्थान करुन नाशिक, धुळे, नगर जिल्ह्यातून ४२ दिंड्या पालखी सोबत घेऊन दरवर्षी २५ दिवसांचा प्रवास करत असतात. यामध्ये साधारण एक ते दिड लाख भाविक रथासोबत हरी नामाच्या गजरात पंढरपूरकडे जात असतात. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूचे संकट लवकर दुर होणार यासाठी शासनाने पंढरपूरवारी संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी वारकरी करत आहेत. संत निवृत्ती महाराज यांचा पालखी सोहळा हा 3O दिवसांवर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेत आषाढी वारीबाबत स्पष्टता लवकर जाहीर करावी, अशी मागणी वारकरी संप्रदायातून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details