महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुन्या नाशिकमधील मैंद वाड्याची भिंत कोसळून १ जखमी - wall collapse nashik

जुन्या नाशिकमधील रविवार पेठेतील मैंद वाड्याची भिंत कोसळली असून यात 1 युवक जखमी झाला आहे. रहिवाशांनी प्रसंगावधान दाखवत वाड्याची भिंत कोसळण्यापूर्वीच तेथून बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नाशिक पालिकेचा पुन्हा एकदा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नाशिकमध्ये वाड्याची भिंत कोसळली

By

Published : Aug 10, 2019, 9:17 AM IST

Updated : Aug 10, 2019, 10:02 AM IST

नाशिक - जुन्या नाशिकमधील मैंद वाड्याची भिंत कोसळली असून यात 1 युवक जखमी झाला आहे. रहिवाशांनी प्रसंगावधान दाखवत वाड्याची भिंत कोसळण्यापूर्वीच तेथून बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नाशिक पालिकेचा पुन्हा एकदा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

नाशिकमध्ये वाड्याची भिंत कोसळली

आतापर्यंत मुंबई आणि पुणे येथील इमारत आणि भिंत कोसळल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये भिंत कोसळल्याची दुर्घटना घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या माहितीनुसार, खांदवे गणपती शेजारी असणाऱ्या मैंद वाड्याची भिंत कोसळली.अग्निशामक दलाचे जवान तात्काळ पोहोचल्याने लोकांना मदत करण्यात आली. जवानांनी वाड्याची पाहणी करून काही धोकादायक झालेला भाग लोखंडी बारच्या साह्याने पाडला, तसेच रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. रहिवाशांनी प्रसंगावधान दाखवल्या मुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र कल्पेश मैंद नावाचा युवक जखमी झाला आहे.

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मागील महिनाभरापासून नाशिक मध्ये जुने वाडे कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. मागील महीनाभारत 15 ते 17 जुने वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात धोकादायक इमारीतींनी नोटिसा देण्याचे सोपस्कार महानगरपालिकेकडून केले जातात. मात्र, वाड्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करून मोडकळीस आलेले वाडे खाली करण्याची जबाबदारी देखील महानगर पालिकेने स्वीकारने गरजेचे असल्याचे स्थानिक सांगत होते.

Last Updated : Aug 10, 2019, 10:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details