नाशिक- राज्यातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 18 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यासाठी आजपासून (शनिवार) नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 15 जानेवारीला मतदान.. - नाशिक ग्रामपंचायत निवडणूक न्यूज
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील एकूण 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता जाहीर..
कोविडमुळे लांबलेल्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील एकूण 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी आहे. 31 डिसेंबरला अर्ज छाननी, तर 4 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज पाठीमागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 4 जानेवारीला चिन्हांचे वाटप होईल आणि 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया होणार आहे. 18 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.