नाशिक - नाशिक मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी मोठ्या उत्साहाने सकाळीच बाहेर पडत मतदान प्रक्रियेत भाग घेतला. मात्र, मतदारसंघातील काही ठिकणी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा प्रकार समोर येत आहे.
नाशिकमध्ये मतदान याद्यांमध्ये गोंधळ, उत्सहात मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारांचा हिरमोड - nashik lok sabha constituency
मतदानकेंद्रांवर मतदारांना त्यांची नावे शोधून देणे आणि मतद करण्यासाठी शासकीय कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या बसण्याचीही व्यवस्था शासनाकडून केली गेलेली नाही. त्यामुळे त्याना मिळेल त्या जागेवर खाली बसून काम करावे लागत आहे.
शहरात अनेक ठिकाणी मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. मात्र, मतदान केंद्रावरील यादीत काही मतदारांची नावेच नाहीत. तर काही ठिकाणी नावे असली तरी बुथ क्रमांक त्या मतदान केंद्रावर उपलब्ध नाही. काही मतदरांना निवडणूक ओळखपत्र जुने असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सकाळीच घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेल्या मतदारांचा हिरमोड झाला.
मतदानकेंद्रांवर मतदारांना त्यांची नावे शोधून देणे आणि मतद करण्यासाठी शासकीय कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या बसण्याचीही व्यवस्था शासनाकडून केली गेलेली नाही. त्यामुळे त्याना मिळेल त्या जागेवर खाली बसून काम करावे लागत आहे. परिस्थिती अशीच राहीली तर मतदान केंद्रांवर गोंधळ उडण्याची शक्यता आहे.