नाशिक - जागतिक योग दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मैदानात पोलिसांनी योगा केला. नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व आठशे कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेत 5 वा जागतीक योग दिन साजरा केला.
शरीर स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी योगा हे अतिशय प्रभावी माध्यम - विश्वास नांगरे पाटील
शरीर स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी योगा हे अतिशय प्रभावी साधन मानले जाते. शरीराला आलेला थकवा काही क्षणात दूर करण्याची ताकद या आसनामध्ये असते. यामुळे प्रत्येकाने सकाळी उठल्यावर योगा करायला हवा. पोलीस दलामध्ये एक तर अवेळी जेवण असेल रात्रीची शिफ्ट किंवा बारा तासाची ड्युटी त्यामुळे निश्चितपणे पाठीचे, पोटाचे, मणक्याचे आजार वाढताना दिसून येतात. त्यामुळे योगा केल्याने फायद्या होनार असल्याचे मत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माडले.
शरीर स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी योगा हे अतिशय प्रभावी साधन मानले जाते शरीराला आलेला थकवा काही क्षणात दूर करण्याची ताकद या आसनामध्ये असते. यामुळे प्रत्येकाने सकाळी उठल्यावर योगा करायला हवा, पोलीस दलामध्ये एक तर अवेळी जेवण असेल रात्रीची शिफ्ट किंवा बारा तासाची ड्युटी त्यामुळे निश्चितपणे पाठीचे, पोटाचे, मणक्याचे आजार वाढताना दिसून येतात. त्यामुळे योगा केल्याने फायद्या होणार असल्याचे मत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माडले.
पोलिसांचे दैनंदिन धावपळीतून स्वास्थ कसे तंदुरुस्त राहील यासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनात मधुमेहापासून हृदयरोगांपर्यत अनेक रोगांचे प्रमाण भीतीदायकरित्या वाढते आहे. त्यावर योगासने हा साधा सोपा बिनखर्चाचा पण प्रभावी उपाय मानला गेला आहे. गेल्या काही वर्षात भारताबाहेरसुद्धा योगाचे महत्व वाढत असून जगभरात कोट्यावधी लोक आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करतात.