महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक : नाशिकमध्ये सोशल मीडियावर जोरदार व्हिडिओ वॉर

सध्या नाशिकमध्ये याच सोशल मीडियाच्या व्हिडिओ वॉरमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ

By

Published : Apr 24, 2019, 10:32 AM IST

नाशिक- नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर जोरदार व्हिडिओ वॉर सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ

सध्या नाशिकमध्ये याच सोशल मीडियाच्या व्हिडिओ वॉरमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या एका व्यासपीठावर माणिकराव कोकाटे यांना झालेल्या धक्काबुक्कीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

माणिकराव कोकाटे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या एका आंदोलना दरम्यान भाषण करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सरकारविरोधात भाषण करू नको, असा दम भरला होता आणि त्यानंतर कोकाटे यांना भर व्यासपीठावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. हा जुना व्हिडिओ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

'मराठा द्वेषी कोकाटे' या आशया खाली हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून राजकीय नेत्यांचे वाद-विवादाचे जुने व्हिडिओ, फोटो लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details