नाशिक (येवला) - लस घ्यावी यासाठी साईनाथ मंदिर ट्रस्टने 'लस घ्या व पैठणी जिंका' असा अभिनव उपक्रम राबवत दर तासाला ड्रॉच्या माध्यमातून पाच पैठणी बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या आहेत.
'लसीकरण करा अन् पैठणी जिंका', येवल्यातील साईनाथ संस्थानचा उपक्रम - initiative of Sainath Sansthan in Yeola
कोरोना लस घ्यावी यासाठी साईनाथ मंदिर ट्रस्टने 'लस घ्या व पैठणी जिंका' असा अभिनव उपक्रम राबवत दर तासाला ड्रॉच्या माध्यमातून पाच पैठणी बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या आहेत.
लस घ्या पैठणी जिंका
नागरिकांनी लसीकरण करावे यासाठी येवला शहरातील साईनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने अनोखी आयडिया राबवली असून, त्या माध्यमातून लसीकरणाच्या दर तासाला लसीकरण झालेल्या नागरिकांमधून लकी ड्रॉ काढून 5 पैठणी साड्या बक्षीस स्वरूपात देण्यात येत आहेत. दिवसभर दर तासाला असा लकी ड्रॉ काढण्यात आला असून, त्याद्वारे पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. यावेळी लसीकरण रजिस्ट्रेशन करता एकूण 10 टेबल लावण्यात आले होते. तर, लस देण्यासाठी तीन टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. जेणेकरून नागरिकांना त्वरित लस उपलब्ध होत होईल.