मनमाड : मागील महिन्यात सलग पाच दिवस मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तब्बल 8 हजार 79 हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. तर 437 गावातील 21 हजार 750 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. सर्वात जास्त नुकसान कांदा पिकाचे झाले असून 3 हजार 556 हेक्टर वरील पीक उध्वस्त झाले आहे. 1 हजार 595 हेक्टरवरील गहूचे नुकसान झाले असून या पिका सोबत हरभरा, द्राक्षे, आंबा यांना देखील मोठा फटका बसला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम तर, आता अवकाळी, गारपीटमुळे रब्बीचा हंगाम हातातून जात असल्याचे पाहून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले होते. मात्र, शासनाने मदत जाहीर केली त्यात अटी, शर्तीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे शक्य नाही.
कांदा अनुदानसह इतर मदतीला जाचक अटी :राज्य सरकारने कांदा पिकाला 350 रुपये अनुदान जाहीर केले मात्र ज्या शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाचा पिकपेरा (नोंद) आहे अशांना मदत मिळणार असल्याची जाचक अट लावली यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली असुन जेवणाच ताट वाढून ठेवलं मात्र हात बांधून ठेवल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.