महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Crime: ऑर्थर पाठोपाठ नाशिक कारागृहातील बंदीवानावर अनैसर्गिक अत्याचार, संशयितावर गुन्हा दाखल - नाशिक कारागृहातील बंदीवानावर अनैसर्गिक अत्याचार

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका बंदीवानावर दुसऱ्या बंदीवानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Nashik Crime:
नाशिक कारागृहातील बंदीवानावर अनैसर्गिक अत्याचार

By

Published : Jun 19, 2023, 11:01 AM IST

नाशिक:ऑर्थर रोड तुरुंगापाठोपाठ नाशिकच्या तुरुंगातही बंदीवानावर अनैसर्गिक अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील सर्कल नंबर 5 मधील बॅरेक नंबर 1 मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. पीडित बंदीवान लघुशंकेसाठी गेला असता संशयित बंदीवानाने अनैसर्गिक अत्याचार केला. विजय रामचंद्र सोनवणे असे या संशयिताचे नाव आहे.

पीडिताने तुरुंग रक्षकाला हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित बंदीवान विजय सोनवणे यांच्या विरोधात अनैसर्गिक अत्याचारबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक काकडे तपास करत आहे.



कैद्यांना एड्स का होतो?चार वर्षांपूर्वी एका अहवालात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात तब्बल 120 बंदिवानांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस झाली होती,कैदी विविध गुन्ह्यांमुळे कारागृहात येतात.बहुतांश गुन्हेगारांना अमली पदार्थ, मद्य सेवन करण्याचे व्यसन असते.अशा व्यक्तीला आधीच संसर्ग असतो. मात्र,निदान होत नाही.तुरुंगात आल्यानंतर लैंगिक सुखापासून वंचित राहतात.अशा वेळी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवतात.या बाधित कैद्यांपासून इतरांना एचआयव्हीची लागण होते असते. ऑर्थर रोड तुरुंगात बंदिवानाला मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना नुकतेच समोर आली आहे. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या तुरुंगातील अशाच प्रकारामुळे पोलीस अधिकारी काय करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठणार आहे.



सतत कारागृह चर्चेत:नाशिकरोड परिसरात मध्यवर्ती कारागृ हे ब्रिटिशकालीन कारागृह आहे. या कारागृहात राज्यातील विविध भागातील गुन्हेगार शिक्षा भोगत आहे. विविध ठिकाणचे कैदी एकत्र आल्याने अनेकदा हाणामारी घटना घडल्या आहेत. तसेच कारागृहात मोबाइल, अमली पदार्थ सापडणे असे अनेक प्रकार घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी उपचारासाठी जात असेलेल्या कैद्याला दोघा कैद्यांनी पाठीमागून येऊन डोक्यात आणि डोळ्यावर फरशी मारून फेकली होती. यात तो कैदी गंभीर जखमी झाला होता. या कारागृहात नेहमी कैद्यांमध्ये हाणामारी होत असल्याने कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. एकूणच कारागृहाची सुरक्षा रामभरोसे असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा-

  1. Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : महिलेवर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
  2. Thane Crime News : उसने पैसे परत मागितले म्हणून दोघांनी केली टीसीची हत्या; अंगठीवरून पोलिसांनी लावला खुनाचा छडा
  3. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या खुनाचा अवघ्या 24 तासात छडा, एका अल्पवयीनासह चौघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details